मिशन स्कॉलरशिप इयत्ता- 5 वी
शिष्यवृत्ती सराव परीक्षा
विषय- गणित
[गुण-22]
लेखन व संकलन- श्री महादेव बाबासाहेब पाटील
= = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = =
प्र.{1}
10 च्या मागची 3 च्या टप्प्याने येणारी पहिली व 10 च्या पुढची 3 च्या टप्प्याने
येणारी दुसरी संख्या यातील फरक किती?
1)8
2)5
3)13
4)9
प्र.{2}
कार्तिक महिन्याचे दिवस किती?
1) 31
2)5
3)13
4)9
प्र.{3}
12 सहस्त्र + 9 सहस्त्र + 7 दशक + 8 एकक =?
1)20078
2)2178
3)21078
4)22078
प्र.{4}
खालीलपैकी चुकीची जोडी कोणती?
1)एक
डझन =12वस्तू
2)एक
दस्ता= 24 कागद
3)1रु.
=100 पैसे
4)एक
लीटर =100 मिलिलीटर
प्र.{5}
अमृत दरमहा 250 रु. चि बचत करतो तर तो 4 वर्षात किओती रकमेची बचत करेल?
1)12500
रु.
2)1000
रु.
3)
11000 रु.
4)12000
रु.
प्र.{6}
4 ची घनसंख्या पुढीलपैकी कोणती?
1)16
2)40
3)20
4)64
प्र.{7}
8, 10, व 15 यांनी निःशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती?
1)60
2)90
3)120
4)100
प्र.{8}
प्रत्येकी 12 मी. लांबीचे 15 समान तुकडे एकमेकांना गाठी बांधून वर्तुळाकार आकृती
तयार केली.तर त्या तुकड्यांच्या किती ठिकाणी काठी बांधाव्या लागतील?
1)13
2)14
3)15
4)16
प्र.{9}
पुण्यातून मुंबईला पोहोचण्यासाठी साडे तीन तास लागतात तर सकाळी साडे दहा वाजता
पुण्याहून निघालेली बस मुंबई या ठिकाणी किती वाजता पोहोचेल?
1)दुपारी
दोन वाजता
2)
दुपारी सव्वा वाजता
3)दुपारी
अडीच वाजता
4)दुपारी
दीड वाजता
प्र.{10}
सुबोधने एका पुस्तकाची 3/5 पाने वाचून झाली. तेव्हा ती 60 पाने वाचून झाली असे
लक्षात आले; तर ते पुस्तक एकूण किती पानाचे होते?
1)150
2)100
3)200
4)120
प्र.{11} एक दोरी एक मीटर लांब आहे. त्या दोरीचा प्रत्येक तुकडा 20 से.मी. चा
करावयाचा आहे तर ती दोरी किती ठिकाणी कापावी लागेल ?
1) 4
2)5
3)6
4)3
= = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = =