मिशन स्कॉलरशिप इयत्ता-5 वी / 4 थी
शिष्यवृत्ती सराव परीक्षा
विषय-गणित
लेखन व संकलन- श्री महादेव बाबासाहेब पाटील
= = = = = = = = = = = = = = = = = = = = = = =
= = = = = = = = = = = = = = =
{1} ‘1435’ या संख्येला
10 ने पूर्ण भाग जाण्यासाठी त्या संख्येत लहानात लहान कोणती संख्या मिळवावी?
1) 2
2) 7
3) 9
4) 5
{2} VIII वाजता तास काटा कोणत्या रोमन अंकांवर असेल ?
1) IX
2) VIII
3) XI
4) XII
{3} खालीलपैकी
चुकीचा गुणाकार कोणता?
1) 109×17=1853
2)307×175=219
3)150×17=2550
4)104×17=1768
{4} 7 3/7 = ?/7 . प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या
येईल?
1) 35
2) 36
3) 38
4) यापैकी नाही
{5} एका दूधाच्या
कॅनमध्ये 15 लीटर दूध होते. त्या दूधापैकी अर्धा लीटर माप असणारे 12 ग्लास दूध
त्यातून मुलांना दिले तर आता कॅनमध्ये किती लीटर दूध शिल्लक राहिले?
1) 6 लि.
2) 5 लि.
3) 9 लि.
4) 10 लि.
{6} ‘135’ या
संख्येचे अवयव नसणारी जोडी कोणती?
1)
45,3
2)15,3
3) 55, 3
4) 27, 5
{7} आमची शाळा 7 वाजून 20 मिनिटांनी सुरु होते. 5 तास 30 मिनिटांनंतर सुटते तर शाळा किती वाजता सुटते?
1) 12 वा. 30 मि.
2)12 वा. 20 मि
3) 12 वा. 50मि
4)12 वा. 40 मि.
{8} XXV भागिले V अधिक IX =?
1)XIV
2)XV
3)XIII
4)XVII
{9} शरदकडे 5
रु. 10 रु. व 20 रु च्या समान नोटा आहेत. त्याच्याकडे एकूण 175 रु. आहेत तर
त्याच्याकडे 10 रु.च्या किती नोटा आहेत?
1) 4
2) 5
3) 6
4) 7
{10} शिवणेखुर्द येथील
हनुमान जयंतीच्या कार्यक्रमासाठी 200 माणसांसाठी खीर तयार करण्यासाठी प्रत्येकी
पाऊण किलोग्रॅम साखर याप्रमाणे किती
किलोग्रॅम साखर लागेल?
1) 100 किग्रॅ.
2) 150 किग्रॅ.
3) 200 किग्रॅ.
4) 250 किग्रॅ.
= = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = =