मिशन स्कॉलरशिप इयत्ता- 5 वी
शिष्यवृत्ती सराव परीक्षा
विषय- मराठी
संकलन- श्री महादेव बाबासाहेब पाटील
= = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = =
प्र.{1}
‘गीता पाटी .................’ हे वाक्य भविष्यकाळी करण्यासाठी योग्य पर्याय
निवडा.
(1)आण
(2)आणेल
(3)आणली
(4)आणते.
प्र.{2}
पुढील वाक्यांपैकी शुद्ध वाक्य कोणते?
(1)सुमन इंग्रजी संभाषणात प्रविण आहे.
(2)सुमन इंग्रजी संभाशणात प्रविन आहे.
(3)सूमन इंगरजी संभाश्नात प्रविण आहे.
(4)सुमन इंग्रजी संबाषणात परवीन आहे.
प्र.{3}
‘ शाळेला चार दिवस सुट्टी होती.’ या वाक्यात किती नामे आली आहेत?
(1)तीन
2)दोन
3)एक
(4)चार
प्र.{4}
पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
(1)चिकाटी
(2)मिरचि
(3)स्पंदन
(4)स्वच्छता
प्र.{5}
‘ पोथी ‘ या शब्दाचे अनेकवचन कोणते?
(1)पोथी
(2)पोथे
(3)पोथ्या
(4)पोथा
प्र.{6}
पुढीलपैकी कोणता प्राणी डरकतो?
(1)हत्ती
(2)बैल
(3)घोडा
(4)म्हैस
(1)स्वार्थी
(2)पुढारी
(3)स्वावलंबी
(4)बहुरूपी
प्र.{8}
‘ भवन, भू, आनन, सदन, धाम, नगर, आलय ‘ या शब्दांत ‘गृह’ या शब्दाचे किती समानार्थी
शब्द आहेत?
(1) चार
(2)पाच
(3)एक
(4)तीन
प्र.{9}
‘ पितामह ‘ कोणाला म्हणतात?
(1)महात्मा गांधी
(2)रवींद्रनाथ टागोर
(3)सुभाषचंद्र बोस
(4) दादाभाई नौरोजी
प्र.{10}
वर्णमालेनुसार खालील शब्दांचा क्रम लावल्यास शेवटचा शब्द कोणता येईल?
(1)नागपूर
(2)भारत
(3)काजवा
(4)तारका
प्र.{11}
‘ तीर ‘ या शब्दांचे दोन वेगवेगळे अर्थ कोणते?
(1)काठ, बाण
(2)काठ, कड
(3)धनुष्य, कोंदड
(4)बाणा, ताना.
प्र.{12}
‘ तों, स, पा, अ, ठ, ड, णे ‘ या अक्षरांपासून बनणाऱ्या वाक्प्रचाराच्या अर्थाचा
वाक्प्रचार पर्यायात कोणता?
(1)जिभेवर नाचणे
(2)जीभ चावणे
(3)जीभ पाघळणे
(4)जिभेला हाड नसणे.
= = = = = = = = = = = = = = = = = = = = = = =
= = = =