मिशन स्कॉलरशिप
इयत्ता- 5 वी
शिष्यवृत्ती सराव परीक्षा
विषय- मराठी
संकलन- श्री महादेव बाबासाहेब पाटील
= = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = =
प्र.{1} खालील शब्दातील पुल्लिंगी शब्द कोणता?
1)जाई
2)जुई
3)चमेली
4)गुलाब
प्र.{2} एखादा भविष्यात कोण होणार आहे, याचा अंदाज बालपणीच येतो.
या वाक्यासाठी म्हण निवडा.
1)लहान तोंडी मोठा घास
2)मुलाचे पाय पाळण्यात दिसतात
3)मनी वसे स्वप्नी दिसे
4)बळी तो कान पिळी
प्र.{3} खालील शब्दाचा प्रत्यय ओळखा. कापडवाला-
(1)काप
2)का
3)वाला
4)कापड
प्र.{4} खालील शब्दाचा उपसर्ग ओळखा. निरोगी -
1)नि
2)रो
3)गी
4)रोगी
प्र.{5] खालील शब्दांतील शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा.
1)जन्माष्टमी
2)जन्मास्ष्ट्मी
3)जम्नाष्टमी
4)जन्मअष्टमी
प्र.{6} समानार्थी शब लिहा. निर्झर-
1)झरा
2)झरझर
3)निर्जन
4)पाणी
प्र.{7} ‘चा हु पा ण र’ अक्षरांचा योग्य क्रम लावल्यास त्यापासून बनणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचे मधले अक्षर कोणते?
1)र
2)हु
3)पा
4)ण
प्र.{8} दिलेल्या शब्दांचा वर्णानुक्रमे क्रम ठरवा.
1)भाषा 2)कविता 3)निबंध 4)कादंबरी 5)आत्मचरित्र
1)2,3,1,4,5
2)5,2,4,3,1
3)5,4,3,1,2
4)1,2,3,4,5
प्र.{9} केशवकुमार हे कोणाचे टोपणनाव आहे?
1) वि.स.खांडेकर
2)प्र.के.अत्रे
3)ना. सी. फडके
4)पु.ल.देशपांडे
प्र.{10} समान अर्थ असलेली वाक्प्रचाराची जोडी कोणती?
1)पोबारा करणे – धूम ठोकणे
2)डोळा लागणे
3)तोंड देणे – तोंड वेंगाडणे
4)हात टेकणे- हात देणे
प्र.{11} खालील वाक्यातील रिकाम्या जागी कोणता शब्द येईल.
[ कोकीळेचा आवाज मंजुळ असतो;पण कावळ्याचे ओरडणे ..................असते.]
1)सुरेल
2)कर्कश
3)भसाडा
4)कर्णमधुर
प्र.{12} ‘ज्याच्यापासून आरपार दिसते‘ या शब्द्समुहाबद्दलएक शब्द द्या.
1)पारदर्शक
2)अपारदर्शक
3)आरसा
4)काच
= = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = =
Reshama Sayyed
ReplyDelete