मिशन स्कॉलरशिप
इयत्ता-5 वी/4 थी
शिष्यवृत्ती सराव परीक्षा
विषय- गणित
लेखन व संकलन- श्री महादेव बाबासाहेब पाटील
= = = = = = = = = = = = = = = = = =
= = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = =
प्र.{1}
दोन संख्यांमधील फरक 73525 असून लहान संख्या 37857 आहे; तर मोठी संख्या कोणती?
1)45668
2)111382
3)131182
4) यांपैकी नाही.
प्र.{2}
37 × 8 दशक या उदाहरणातील गुण्य व गुणक यांची अदलाबदल केली तर नवीन गुणाकार किती
पात येईल?
1)निमपट
2)दुप्पट
3)चौपट
4)फरक पडणार नाही.
प्र.{3}
प्रत्येकी रु. 250 प्रमाणे 150 पालकांनी शाळेला देणगी दिली. या देणगीतून एक बाक
1250 रु. प्रमाणे बाके खरेदी केली; तर त्या शाळेने एकूण किती बाके खरेदी केली?
1)30
2)35
3)40
4)50
प्र.{4}
एक्याऐंशी हजार आठशे अठरा अंकांत लिहा.
1)81,818
2)8,10,818
3)81,80,018
4)8,118
प्र.{5}
एका शाळेने 300 विद्यार्थ्यांची 250 रुपयांप्रमाणे परीक्षा फी जमा केली. ती फी 5
परीक्षेसाठी खर्च केली; तर एका परीक्षेला किती रुपये खर्च आला?
1)15,000
2)1,500
3)150
4)2,500
प्र.{6}
मोहन व अजित यांच्याकडे अनुक्रमे 2,587 रुपये व 2,245 रुपये आहेत. जर मोहनने 125
रु. अजितला दिले; तर दोघांकडील रकमेत किती रुपये फरक पडेल?
1)256
2)148
3)184
4)92
प्र.{7}
50 रुपयांच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 49,695 पासून 49,734 प्रांत क्रमांक
आहेत; तर पुडक्यातील एकूण रक्कम किती?
1)1950 रु.
2)2000
3)2500
4)3000
प्र.{8}
विभाज्य- विभाजक अशी जोडी खालीलपैकी कोणती?
1)50, 6
2)27, 6
3)42, 6
4) 49, 9
प्र.{9}
1 रु. 50 पै. दराने 15000 पानांची छपाई केली. त्या पानांची 100 पुस्तके बनविली; तर
एका पुस्तकाला किती रुपये खर्च आला?
1)325
2)225
3)235
4)335
प्र.{10}
एके दिवशी शाळा सकाळी सव्वासातला भरली व पावणेएकला सुटली; तर शाळा किती वेळ होती?
1)
साडेसहा
तास
2)पावणेपाच तास
3)साडेपाच तास
4)सव्वापाच तास
= = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = =