मिशन स्कॉलरशिप
इयत्ता- 5 वी / 4 थी
शिष्यवृत्ती सराव परीक्षा
विषय- मराठी
संकलन- श्री महादेव बाबासाहेब पाटील
= = = = = = = = = = = = = =
= = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = =
प्र.{1} ‘दिन’
या शब्दातील पहिल्या अक्षराची वेलांटी दीर्घ केल्यास नवीन तयार होणाऱ्या शब्दाचा
अर्थ खालीलपैकी कोणता?
1)दिवस
2)दिवाळी
3)गरीब
4)दीन
प्र.{2] ‘चिता’ या शब्दातील पहिल्या
अक्षरावर अनुस्वार दिल्यास तयार होणाऱ्या नवीन शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता?
1)सरण
2)चिंता
3)काळजी
4)बिबळ्या
प्र.{3} ‘कळ लावणे’ या वाक्प्रचारातील ‘कळ’ या शब्दाचा नेमका अर्थ काय? 1)वेदना
2)भांडणे
3)भांडण
4)पाठपुरावा
प्र.{4} ध्रुव बाळाला परमेश्वराने वर दिला. या वाक्यातील वर म्हणजे काय?
1)नवरा
2)आशीर्वाद
3)वरची बाजू
4)बक्षीस
प्र.{5} ‘स, ट, क, र, का’. या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दातील मधले अक्षर व शेवटचे अक्षर घेऊन तयार शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता?
1)कारस्थान
2)कावळा
3)पाणि
4)माळ
प्र.{6} ‘ध, सा, री, व, गि’ या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दातील शेवटची दोन अक्षरे घेऊन तयार होणाऱ्या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता?
1)ठार
2)पर्वत
3)श्रीमंत
4)व्रत
प्र.{7} आशियाई खो – खो स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंचा
............. जाहीर झाला.
1)गट
2)वृंद
3)संघ
4)पथक
प्र.{8]
कोळ्याच्या हातातील ताज्या माशांची
----------- त्याने सांगितलेल्या किमतीत विकत घेतली.
1)गाथन
2)जुडी
3)पेंढी
4)चवड
प्र.{9} नर्तिकेच्या पायातली पैंजणे ------------ वाजत होती.
1)छुमछुम
2)खणखण
3)छनछन
4)किणकिण
प्र.{10}
उन्हाळ्यात सागवनात सुतारपक्ष्याचा दूरवरून --------------- कानी पडतो.
1)फुत्कार
2)टणत्कार
3)घुत्कार
4)चित्कार
प्र.{11} डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहणे -
1)लक्ष
2)कटाक्ष
3)दृष्टी
4)नजर
प्र.{12} मजकुराची निवड व मांडणी करणारा –
1)वार्ताहर
2)संकलक
3)निर्माता
4)संपादक
प्र.{13} हिरव्या रंगाचे मूल्यवान रत्न –
1)माणिक
2)हिरा
3)पाचू
4)निलमणी
= = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = =