मिशन स्कॉलरशिप
इयत्ता-५ वी
शिष्यवृत्ती सराव परीक्षा
विषय-गणित
लेखन व संकलन- श्री महादेव बाबासाहेब पाटील
= = = = = =
= = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = =
1)211011 ही
संख्या अक्षरी लिहा.
1)एकवीस हजार एकशे अकरा
2)दोन लक्ष अकरा हजार अकरा
3)दोन लक्ष एक हजार एकशे अकरा
4)वीस लक्ष अकरा हजार अकरा
2) 57,720 ही संख्या तिच्यातील अंकांच्या स्थानिक
किंमतीच्या बेरजेच्या स्वरुपात लिहिली आहे,ती कोणती?
1)5×10000+7×1000+7×100+2×10+0
2)5000+7+7000+70+200+0
3)5000+70+20+0+700
4)50000+200+700+7000+00
3) 18 लीटर दुधाची किटली पूर्ण भरण्यासाठी 500 मिली.
मापाची किती मापे दूध किटलीत भरावे लागेल?
1) 18
2) 36
3) 10
4) 9
4) 4/2, 7/3, 1/3,
8/6, 6/13 यापैकी समछेद अपुर्णाकांची जोडी
कोणती?
1) 7/3, 6/13
2)1/3, 8/6
3) 4/2, 1/3
4) 1/3,
7/3
5) एका
चौरसाकृती मैदानाभोवती 5 फे-या मारून
सुमित दररोज 4 कि.मी. धावण्याचा सराव करतो. तर त्या
मैदानाच्या एका बाजूची लांबी किती?
1)100 मीटर
2)200 मीटर
3)400 मीटर
4)300 मीटर
6) आकाशजवळ 50 रूपयांच्या 4 नोटा आहेत.20
रुपयांच्या 3 नोटा आहेत. व 10 रुपयांच्या
5 नोटा आहेत, तर
त्याच्याजवळ एकूण रुपये किती?
1) 350 रु.
2) 2110 रु.
3) 310 रु.
4) 4340
रु.
7) अर्ध्या तासाचे सेकंद किती ?
1) 1800
2)3600
3)1500
4)2600
8)
इष्टीकाचीतीच्या कडांची संख्या व पृष्ठभागांची संख्या यातील फरक किती ?
1)12
2)4
3)6
4)0
9)
8*5* या संख्येतील फुलीच्या जागी समान अंक आहेत. त्यांच्या स्थानिक किंमतींची
बेरीज 707 आहे; तर * च्या जागी असलेला अंक कोणता?
1) 7
2) 8
3) 5
4) 0
10) 8
मार्च 2015 चा जागतिक महिला दिन रविवारी आला असल्यास 8 मार्च 2016 चा जागतिक महिला
दिन कोणत्या वारी येईल ?३.
1) रविवार
2)सोमवार
3)मंगळवार
4)शनिवार
11)
सकाळी साडेआठ वाजता सुरु झालेली सभा दुपारी पावणेदोन वाजता संपली तर सभा किती वेळ
सुरु होती?
1) 5 तास 15 मिनिटे
2)5 तास 25 मिनिटे
3) 6तास 15 मिनिटे
4) 5 तास 35 मिनिटे
12)
दोन अंकी विषम मूळ संख्या किती आहेत?
1) 25
2) 24
3) 21
4) 22
= = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = =