मिशन स्कॉलरशिप
इयत्ता-
5 वी
शिष्यवृत्ती सराव परीक्षा
विषय- गणित
[गुण-20]
संकलन- श्री महादेव बाबासाहेब पाटील
प्र.{1} 4 पुस्तके व 5
वह्यांची किंमत 83 रु. आहे. 5 पुस्तके व 4
वह्यांची किंमत 88 रु. आहे, तर 2 पुस्तके व 2 वह्यांची किंमत किती?
(1)38 रु.
(2)36 रु.
(3)34 रु.
(4)40 रु.
प्र.{2} 1 ते 100
पर्यंतच्या संख्या लिहिण्यास वापरण्यात येणाऱ्या 0 ते 9 अंकाची बेरीज किती?
(1)90
(2)45
(3)36
(4)55
प्र.{3} सकाळी 7 वा. 30
मि. सुटलेली बस सुरेशला 5 मि. साठी चुकली. सुरेशचे घडयाळ 15 मि. मागे असल्यास,
सुरेश बस स्टॉपवर पोहोचला,तेव्हा त्याच्या घड्याळात किती वाजले होते?
(1)सव्वा सात
(2)7 वा.25 मि
(3)7 वा.20 मि.
(4)7 वा.50 मि.
प्र.{4} 50 रुपयांच्या
नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 321992 पासून 322025 पर्यंत क्रमांक आहेत; तर
पुडक्यातील एकूण रक्कम किती?
(1)3400 रु.
(2)1650 रु.
(3)1700 रु.
(4)1750
रु.
प्र.{5} एका खोक्यात
जेवढे चेंडू तेवढी खोकी घेतल्यास ;225 चेंडूसाठी किती खोकी घ्यावी लागतील?
(1) 15
(2)25
(3)9
(4)5
प्र.{6} एका माळेत
जेवढी फुले तेवढ्या माळा करावयाच्या झाल्यास; 144 फुलांच्या किती माळा तयार करता
येतील?
(1)24
(2)16
(3)8
(4)12
प्र.{7} एका चौरसाची
बाजू (4अ +3ब)सेमी आहे; तर त्या चौरसाची परिमिती किती सेमी?
(1)8अ +6ब
(2)16अ +9 ब
(3)8अ +12ब
(4)16अ +12ब
प्र.{8} प्रज्ञा तिच्या
आईपेक्षा 22 वर्षांनी लहान आहे. त्या दोघींच्या वयांची बेरीज 48 वर्षे आहे; तर
प्रज्ञाचे वय किती?
(1)26 वर्षे
(2)14 वर्षे
(3)13 वर्षे
(4)17 वर्षे
प्र.{9} दोन संख्यांची
बेरीज 55 असून, त्या दोन संख्यांमधील फरक 13 आहे; तर त्यापैकी लहान संख्या
कोणती?
(1)32
(2)42
(3)16
(4)21
प्र.{10} एका आयताकृती
बागेची लांबी 280 मीटर व रुंदी 120 मीटर असल्यास ; त्या बागेसभोवती कुंपनासाठी
तारेचे 7 फेरे देण्यास किती कि.मी. तर लागेल?
(1)2 कि.मी.
(2)3 कि.मी.
(3)4 कि.मी.
(4)5 कि.
= = = = = = = = = = = =