मिशन स्कॉलरशिप
इयत्ता-
5 वी
शिष्यवृत्ती सराव परीक्षा
विषय- गणित
[गुण-24]
संकलन- श्री महादेव बाबासाहेब पाटील
प्र.{1} 1, 2, 3, 4 हे
अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून 2000 पेक्षा मोठ्या अशा एकूण किती संख्या तयार
होतील?
(1)24
(2)12
(3)6
(4)18
प्र.{2} 0.37 मीटर बाजू
असलेल्या समभूज त्रिकोणाची परिमिती किती?
(1)111 सेमी
(2)1.11 मीटर
(3)11.1 डेसी मीटर
(4) तिन्ही पर्याय
बरोबर
प्र.{3} 25 57/95 ह्या
अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकातील रूप कोणते?
(1)25.57
(2)25.6
(3)25.03
(4)25.3
प्र.{4} कविताकडे 5 रु.
व 10 रु. यांच्या एकूण 30 नोटा आहेत, त्यापैकी 5 रु. च्या नोटा 10 रु. च्या
नोटांपेक्षा 8 ने जास्त आहेत; तर कविताकडे एकूण रक्कम किती?
(1)110 रु.
(2)205 रु.
(3)245 रु.
(4)210 रु.
प्र.{5} 15 × 76
(1)1140
(2)79
(3)225
(4)41
प्र.{6} 8× 6
(1)2
(2)92
(3)0
(4)24
प्र.{7} खालीलपैकी
कोणत्या महिन्यात 5 वेळा फक्त दोन वार येतात?
(1)जानेवारी
(2)जून
(3)फेब्रुवारी
(4)मार्च
प्र.{8} घड्याळात चार
वाजून चाळीस मिनिटे झाली असता मिनिट काटा खालीलपैकी कोणत्या अंकावर असेल?
(1)VII
(2)IV
(3)IX
(4)VIII
प्र.{9} खालीलपैकी
कोणता कालावधी सर्वात लहान आहे?
1)48 मिनिटे
2)0.75तास
3) 5/6 तास
(4)सव्वा
तास
प्र.{10} 6 ग्लास व
पेले यांची एकूण किंमत 68 रु. असून 5 ग्लास व 5 पेले यांची एकूण किंमत 65 रु. आहे;
तर एका ग्लासची किंमत किती?
(1) 5 रु.
(2)8
(3)7 रु.
(4)9 रु.
प्र.{11} 5 रुपयांच्या
नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 12387 पासून 12426 पर्यंत क्रमांक आहेत; तर
पुडक्यातील एकूण रक्कम किती?
(1)295 रु.
(2)200 रु.
(3)195 रु.
(4)700 रु.
प्र.{12} 11 रुपये 75
पैसे = किती पैसे?
(1)11750
(2)117500
(3)1175
(4)185.
= = = = = = = = = = = = =