मिशन स्कॉलरशिप
इयत्ता-
5 वी
शिष्यवृत्ती सराव परीक्षा
विषय- गणित
[गुण-22]
संकलन- श्री महादेव बाबासाहेब पाटील
प्र.{1} 256 ÷ क = 16 तर क = किती?
1)16
2)6
3)24
4)18
प्र.{2} 9 × क्ष +
क्ष × 9 =324, तर म= ?
1)9
2)16
3)12
4)18
प्र.{3} 1 1/8
किलोमीटर = किती मीटर ?
1)225 मी.
2)1225 मी.
3)1125 मी.
4)यापैकी नाही
प्र.{4} 2 मीटर
लांबीच्या तारेतून 125 मिलीमीटर तार कापून घेतली;तर उरलेल्या तारेची लांबी किती?
1)1875 मि.मी.
2)18.75 डेसि मी.
3)187.5 सेमी
4)तिन्हीही पर्याय बरोबर
प्र.{5} एका पावाचा
2/4 भाग रमेशला, 2/8 भाग उमेशला, 2/12 वा भाग सतीशला व 2/24 वा भाग ऋषीकेशला दिला,
तर सगळ्यात कमी पावाचा भाग कोणाला मिळाला?
1)रमेश
2)उमेश
3) ऋषीकेश
4)सतीश
प्र.{6] अर्चनाने एका
पुस्तकाची 52 पाने वाचली; तेव्हा त्या पुस्तकाची 3/7 पाने वाचावयाची शिल्लक
राहिली; तर त्या पुस्तकात एकूण पाने किती असतील?
1)104 .
2)91
3)98
4)105
प्र.{7} 8/15 मध्ये
किती मिळवल्यास उत्तर 2 येईल?
1)14/15
2)22/15
3)16/15
4)20/15
प्र.{8] जब्याकडे
जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत. त्या सर्वांचे एकूण पाय 96
आहेत; तर जब्याजवळील एकूण कोंबड्या किती?
1)48
2)24
3)12
4)16
प्र.{9] महादेवजवळ 5
पाकळ्यांची जेवढी फुले आहेत त्याच्या निम्मी फुले त्याच्याच्याजवळ 4 पाकळ्यांची
आहेत.त्या सर्व फुलांच्या एकूण पाकळ्या 112 आहेत,तर 4 पाकळ्यांची एकूण फुले किती?
1)16
2)7
3)8
4)14
प्र.{10} अहमदनगरला
गेलेल्या 35 लोकांचा खर्च 7070 रुपये झाला;तर 5 व्यक्तींना किती खर्च आला?
1)202
2)2020
3)1010
4)1100
प्र.{11} पावणेसात कि.ग्रॅ.
लोणच्याच्या 150 ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या होतील?
1)20
2)45
3)30
4)32
= = = = = = = = =