मिशन स्कॉलरशिप
इयत्ता- 5 वी
शिष्यवृत्ती सराव परीक्षा
विषय- गणित
[गुण-22]
संकलन- श्री महादेव बाबासाहेब पाटील
प्र.{1}
खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने गुणले असता गुणाकार सम संख्या येईल?
1)232
2)233
3)231
4)235
प्र.{2}
यशने एका पुस्तकाची 52 पाने वाचली तेंव्हा त्या पुस्तकाची 3/7 पाने वाचायची शिल्लक
राहिली, तर त्या पुस्तकात एकूण पाने किती?
1)104
2)98
3)91
4)39
प्र.{3}
प + 15 + 17 + फ = 50, जर ‘प’ चि किंमत 7 असेल, तर प × फ = ?
1)77
2)126
3)63
4)84
प्र.{4]
13 यंत्रांची किंमत 6500 रु. आहे, तर अशा 5 यंत्रांची किंमत किती?
1)6000 रु.
2)4500 रु.
3)2500 रु.
4)5000 रु.
प्र.{5}
एका आयताची परिमिती 64 मीटर आहे. या परीमितीच्या 1/4 इतकी चौरसाची प्रत्येक बाजू
आहे; तर चौरसाची प्रत्येक बाजू किती मीटर आहे?
1)8
2)4
3)16
4)32
प्र.{6}
45 मी. लांबी असलेल्या एका आयताकृती बागेभोवती तारेचे 7 वेढे देण्यासाठी 952 मी.
तार लागली; तर त्या बागेची रुंदी किती?
1)46
2)23
3)30
4)27
प्र.{7}
खालीलपैकी कोणत्या महिन्यात 5 वेळा फक्त दोन वार येतात?
1)जानेवारी
2)जून
3)फेब्रुवारी
4)ऑगष्ट
प्र.{8}
1 1/8 किलोमीटर = किती मीटर?
1)225 मी.
2)1125 मी.
3)1225 मी.
4)यापैकी नाही
प्र.{9}
1 ते 50 पर्यंतच्या सम व विषम संख्येच्या बेरजेतील फरकाला 5 ने भागल्यास उत्तर काय
येईल?
1)125
2)50
3)30
4)5
प्र.{10}
20 मी. बाजू असलेले दोन चौरस एकमेकांना जोडले तर तयार होणा-या आकृतीची परिमिती
किती?
1)120 मी.
2)120 सेंमी
3)150 सेंमी
4)160 मी.
प्र.{11}
एका समद्विभूज त्रिकोणाची परिमिती 28 सेंमी असून समान बाजूची लांबी 10 सेंमी असल्यास
असमान बाजूची लांबी किती?
1)17
2)8
3)4
4)23
= = = = = = = = = = = = = = = = = = = = = =
= = = = =