मिशन स्कॉलरशिप
इयत्ता- 5 वी / 4 थी
शिष्यवृत्ती सराव परीक्षा
विषय- गणित
[गुण-22]
संकलन- श्री महादेव बाबासाहेब पाटील
प्र.{1} खालीलपैकी
चुकीचा पर्याय कोणता?
1)26 × 2 – 2 = 50
2)18 × 4 – 52 = 20
3)25 × 2 + 50 = 252
4)18 × 5 – 18 × 4 = 18
प्र.{2} दोन डझन
पेनांची किंमत 72 रु आहे; तर पाऊण डझन पेनांची किंमत किती?
1)27 रु.
2)30 रु.
3)36 रु.
4)42 रु.
प्र.{3} वैष्णवीने
दुकानातून पाऊण किलो बाजरी, अर्धा किलो शाबूदाणा, सव्वा किलो शेंगदाणे व पावणेदोन
किलो साखर घेतली; तर तिने घेतलेल्या सामानाचे एकूण वजन किती?
1)सवा पाच किलो
2)पावणे चार किलो
3)साडेचार किलो
4)सवा चार किलो
प्र.{4}चार अंकी
मोठ्यात मोठी सम संख्या घेऊन त्यात खालीलपैकी कोणती संख्या वजा केल्यास तीन अंकी
लहानात लहान संख्या ठरेल?
1)9899
2)8998
3)9000
4)9898
प्र.{5} नागराजचा पगार
10850 रु आहे.त्यांचा फेब्रुवारी महिन्यातील खर्च पुढीलप्रमाणे झाला. 1200 रु
घरभाडे, 1500 रु. किराणा, 700 रु. वीजबिल व इतर खर्च तर त्या महिन्यात
त्यांच्याकडे किती रक्कम शिल्लक राहील?
1)7450रु
2)8450 रु
3)6450रु
4)6550 रु
प्र.{6} 1654 × 235 तर
गुणाकार किती?
1)388690
2)388672
3)378690
4)386890
प्र.{7}1800 पेरू 15
पेट्यात समान भरले; त्यापैकी 10 पेट्या कोल्हापूरला विक्रीसाठी पाठविल्या तर किती
पेरू कोल्हापूरला पाठविले?
1)120
2)1200
3)900
4)1500
प्र.{8} 17 ची 5 वि
विभाज्य संख्या व 24 ची 3 री विभाज्य संख्या यांची बेरीज किती?
1)124
2)168
3)198
4)157
प्र.{9} एका बॉक्सची
उंची 21 सेमी आहे. एकावर एक ठेवलेल्या अशा 25 बॉक्सची उंची किती मि.मी. होईल?
1)525
2)5250
3)52500
4)5.25
प्र.{10} पावणेदोन तास
+ पाऊण मिनिट =किती सेकंद?
1)3645
2)6345
3)7200
4)5445
प्र.{11] खालीलपैकी
चुकीची तारीख कोणती?
1)28/3/2002
2)31/3/2002
3)31/12/2002
4)31/1/2002
= = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = =