मिशन स्कॉलरशिप
इयत्ता- 5 वी / 4 थी
शिष्यवृत्ती सराव परीक्षा
विषय-मराठी
लेखन व संकलन- श्री महादेव बाबासाहेब पाटील
= = = = = = = = = = = = = = = = = = = = = = =
= = = = = = = = = = = = = =
प्र.{1}
‘भारताने क्रिकेट सामणा गमावला.’या वाक्यातील कोणता शब्द अशुद्ध लिहिला आहे?
1)भारताने
2)सामणा
3)क्रिकेट
4)गमावला
प्र.{2}
‘कणिक तींबणे ‘ या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता?
1)मार देणे
2)अर्पण करणे
3)पोळ्या लाटणे
4)यापैकी नाही
प्र.{3}
खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा.
1)परीभ्रमन
2)परीब्रमन
3)परिभ्रमण
4)परिभ्रमन
प्र.{4}गटात
न बसणाऱ्या शब्दाचा पर्याय क्रमांक लिहा.
1)झाडेझुडपे
2)मनोगत
3)खाडाखोड
4)गंमतजंमत
प्र.{5}खाली
अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा.
ण, र, कु, दा, अ, ची
1)अणकुचीदार
2)टोकदार
3)अणदारकुची
4)णरकुदाअची
प्र.{6}
खालील वाक्यातील दुहेरी अवतरणचिन्हातील शब्दाचा अर्थ चौकटीत लिहा.
[महादेवी
आपल्या सुमधुर “वाणी” ने श्रीमंत झाली.]
1)स्वभाव
2)वर्तणूक
3)बोली
4)यापैकी नाही
प्र.{7} ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ या वाक्यात नसणारा शब्द कोणता?
1)वेली
2)झाडे
3)नातलग
4)प्राणी
प्र.{8}
‘हिताची गोष्ट सांगणे’ या शब्द्समुहासाठी एक शब्द कोणता?
1)वक्ता
2)भाषण
3)उपदेश
4)वचन
प्र.{9} स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवून आमच्या शाळेने ...............
1)हाय खाल्ली
2)आहुती दिली
3)नांगी टाकली
4)बाजी मारली
प्र.{10} ‘फुले’ या नामासाठी उपयोगी नसलेले विशेषण कोणते?
1)रंगीत
2)कोमल
3)श्रीमंत
4)सुगंधी
= = = = = = = =