इयत्ता- 5 वी / 4 थी
शिष्यवृत्ती सराव परीक्षा
विषय-मराठी
लेखन व संकलन- श्री महादेव बाबासाहेब पाटील
= = = = = = = = = = = = = = = = = = = = = = =
= = = = = = = = = = = = = =
प्र.{1}
‘किती सुंदर पक्षी आहे तो’ या वाक्याच्या शेवटी
कोणते विरामचिन्ह येईल?
1)अवतरणचिन्ह
2)प्रश्नचिन्ह
3)पूर्णविराम
4)उद्गारचिन्ह
प्र.{2}
‘वदन’ च्या समानार्थी नसलेला शब्द कोणता?
1)तन
2)तुंड
3)मुख
4)आनन
प्र.{3}
खालीलपैकी कोणता जोडशब्द नाही?
1)ओलासुका
2)सद्वर्तन
3)नेआण
4)मित्रमैत्रिणी
प्र,{4}
‘संकेतला गावाला जायचि घाई झाली होती.’ या वाक्यासाठी योग्य वाक्प्रचार सांगा.
1)टेंभा मिरवणे
2)उतावीळ होणे
3)तडीस नेणे
4)मुग गिळणे
प्र.{5}
‘कलाकार’ हा शब्द कसा तयार झाला आहे?
1)कल + आकार
2)कला + आकार
3)कला + कार
4)कलाका + र
प्र.{6}
खालीलपैकी शब्दांची योग्य रचना असलेले वाक्य कोणते?
1)नळातून गढूळ होते पाणी येत.
2)गढूळ नळातून येत पाणी होते.
3)नळातून गढूळ पाणी येत होते.
4)पाणी येत नळातून गढूळ होते.
प्र.{7}
नग, मेरू, शैल या गटात बसणारा शब्द कोणता?
1)अचल
2)सागर
3)भूप
4)अंबर
प्र.{8}
‘खेडे’ या नामापासून तयार होणारे विशेषण
कोणते?
1)खेडी
2)खेडवळ
3)खेडेगाव
4)खेडयांत
प्र.{9}
‘तपास’ व ‘कापड विणण्याचे यंत्र’ असे दोन्ही अर्थ असणारा शब्द कोणता?
1)बाणा
2)गिरणी
3)व्यास
4)माग
प्र.{10}
खालीलपैकी शुदध शब्द कोणता?
1)निरीक्षन
2)नीरिक्षण
3)निरीक्षण
4)निरिक्षण
प्र.{11}
‘निरक्षर मनुष्य’ या अर्थाचा आलंकारिक शब्द कोणता?
1)अष्टपैलू
2)अंगठाछाप
3)अजातशत्रू
4)टोळभैरव
प्र.{12}
खालील वाक्यात किती अशुदध शब्द आहेत? ‘ कोणताही मनुश्य सतत दिर्घोद्योगानेच
पराक्रमी व बुदधिमान होऊ शकतो.’
1)दोन
2)तीन
3)चार
4)पाच
प्र.{13}
गटातील वेगळा शब्द कोणता ?
1)भय
2)चीड
3)संताप
4)कोप
= = = = = = = = = = =