मिशन स्कॉलरशिप
इयत्ता- 5 वी / 4 थी
शिष्यवृत्ती सराव परीक्षा
विषय-मराठी
लेखन व संकलन- श्री महादेव बाबासाहेब पाटील
= = = = = = = = = = = = = = = = = = = = = = =
= = = = = = = = = = = = = =
प्र.{1} पुढील वाक्यातील नाम ओळखा.
माणसाच्या अंगी धीटपणा असावा.
1)धीटपणा
2)अंगी
3)माणसाच्या
4)असावा
प्र.{2} खालील पर्यायातील एकवचनी शब्द लिहा.
1) माकडे
2)गोळ्या
3)मैत्रीण
4)घड्याळे
प्र.{3} वाक्यात थोडे थांबावे लागते तेथे ..... हे चिन्ह देतात.
1)पूर्णविराम
2)स्वल्पविराम
3)प्रश्नचिन्ह
4)उद्गारचिन्ह
प्र.{4} “अगं, कुठं होतीस तू ?” आईने विचारले. या वाक्यात कोणते विरामचिन्ह नाही?
1)उद्गारचिन्ह
2)अवतरणचिन्ह
3)स्वल्पविराम
4)प्रश्नचिन्ह
प्र.{5} खालीलपैकी पुल्लिंग व स्त्रीलिंग अशा दोन्ही लिंगात येणारा शब्द
कोणता?
1)नायक
2)कवी
3)छात्र
4)अधिकारी
प्र.{6} खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता?
1)पंडित
2)बक्षिस
3)वीर
4)साधू
प्र.{7} खालील वाक्यातील प्रसंगासाठी कोणती म्हण लागू पडेल.
खो-खो मध्ये पहिल्यांदाच खेळणाऱ्या
आर्यनने सर्वांपेक्षा चांगला खेळ केला.
1)उचलली जीभ लावली टाळ्याला.
2)डोळ्यात केर नि कानात फुंकर.
3)एक ना धड भाराभर चिंध्या.
4)कानामागून आली आणि तिखट झाली.
प्र.{8} पुढील शब्दातील प्रत्यय ओळखा.
इत्यादींसह –
1)इ
2)सह
3)इत्या
4)इत्यादी
प्र.{9} ध्वनिदर्शक शब्द लिहा.
‘विराजच्या हातून काचेचा पेला ...... फुटला.
1)धापकन
2)सटकन
3)खळळकन
4)सपकन
प्र.{10} लोकशाहीर म्हणून कोण ओळखले जाते?
1)ना.सी,फडके
2)गो.नी.दांडेकर
3)जयवंत दळवी
4)अण्णाभाऊ साठे
प्र.{11} खालील शब्दातील जोडशब्द नसलेला पर्याय लिहा.
1)भाकरतुकडा
2)लाकूडफाटा
3)माय माऊली
4)भावजय
प्र.{12} समानार्थी शब्दाचा चुकीचा पर्याय लिहा.
1)सुगम-सुलभ
2)साधू-संन्यासी
3)नदी-सविता
4)क्षमा-माफी
= = = = = = = =