मिशन स्कॉलरशिप
इयत्ता- 5 वी
शिष्यवृत्ती सराव परीक्षा
विषय- मराठी
[गुण-24]
संकलन- श्री महादेव बाबासाहेब पाटील
= = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = =
प्र.{1}
खाली शब्दातील नपुसकलिंगी शब्द ओळखा.
(1) सूर्य
2)चंद्र
3)आकाश
4)चांदणी
प्र.{2}
चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य ओळखा.
1)मला कविता आवडते.
2)तू कोठे गेला होतास.
3)नंदा छान गाणे म्हणते.
4)मी नाटक पाहिले.
प्र.{3}
‘सूर’ या शब्दाला उपसर्ग लावून तयार होणारा शब्द कोणता?
1)सूरताल
2)सूरपारंबी
3)असुर
4)सरस
प्र.{4}
खालील अक्षरांपासून तयार होणार्या शब्दातील शेवटचे अक्षर कोणते?
1)बा
2)प
3)ण
4)ल
प्र.{5}
योग्य जोडी ओळखा.
1)विवेकानंद- परमहंस
2)चांगदेव- नामदेव
3)मुक्ताबाई- जनाबाई
4)नामदेव-ज्ञानेश्वर
प्र.{6}
चुकीची जोडी शोधा.
1)महात्मा- ज्योतिबा फुले
2)महर्षी- कर्वे
3)नेताजी – सरदार पटेल
4)राष्ट्रपिता –
म.गांधी
प्र.{7}
खालील शब्दाचा प्रत्यय ओळखा. नदीकडे –
1)न
2)नदी
3)कडे
4)डे
प्र.{8}
औदुंबर कोणास म्हणतात?
1)वड
2)आंबा
3)चिंच
4)उंबर
प्र.{9}
सा. न. या संक्षिप्त रूपाचे पूर्ण रूप ओळखा.
1)सादर नमन
2)साभार नकार
3)साष्टांग नमस्कार
4)सप्रेम नमस्कार
प्र.{10}
‘अश्रू’ या शब्दासाठी अलंकारिक शब्द कोणता?
1)धारा
2)गंगा –गोदावरी
3)गंगा –जमुना
4)गंगोद्य
प्र.{11} ही काय शौर्याची कामगिरी झाली
[या वाक्याच्या
शेवटी कोणते विरामचिन्ह येईल?]
1)प्रश्नचिन्ह
2)अवतरणचिन्ह
3)उद्गारचिन्ह
4)पूर्णविराम
प्र.{12}
‘लालूच दाखविणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता?
1)मोहात पडणे
2)मोह होणे
3) भ्रष्टाचार करणे
4)मोहात पाडणे
= = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = =